IIT fee raised : अनुसूचित जाती आणि जमाती , अपंग विद्यार्थी आणि एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती आहे.
भारतीय तंत्रविज्ञान संस्थेच्या (आयआयटी) शैक्षणिक शुल्कात तब्बल एक लाख रूपयांची वाढ करण्यात आल्याचे गुरूवारी जाहीर झाले. आयआयटीचे सध्याचे शैक्षणिक शुल्क ९० हजार इतके असून आता ही रक्कम दोन लाख इतकी होणार आहे. शैक्षणिक शुल्कात अचानक करण्यात आलेल्या या भरघोस वाढीमुळे पालकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्त्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना या शुल्कात दोन तृतीयांश इतकी सवलत दिली जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती , अपंग विद्यार्थी आणि एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची माहिती आहे.
Indian Institute of Technology (IIT) fee raised from Rs. 90,000 to Rs. 2 lakh