बायकोशी भांडण झाले म्हणून दुबईत २७ वर्षांच्या एका भारतीय व्यक्तीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी आत्महत्या केली. स्थानिक पोलिसांनी याबद्दल माहिती दिली.
संबंधित व्यक्तीचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. दुबईमधील जुमेर लेक भागात हे दाम्पत्य राहात होते. नवरा आणि बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने बायको घर सोडून निघून गेली. त्यानंतर नवऱयाने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. संबंधित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना आत्महत्याच असल्याचे दुबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे संचालक ब्रिगेडियर खलील मनसौरी यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
(संग्रहित छायाचित्र)