जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी मालकी हक्क मिळवल्यानंतर ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला. असे असताना भारतीय मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ‘कू’ने ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे म्हटले आहे. असे असतानाच आता केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी कू मायक्रोब्लॉगिंग साईटबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ट्विटरची जागा आता ‘कू’ने घ्यावी, असे पीयूष गोयल म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘ट्विटर’मध्ये राजीनामासत्र; काही कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे प्रयत्न

“सध्या ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटबाबत बराच गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ पाहून ‘कू’ या माध्यमावर मी सक्रिय असल्याचे मला समाधान वाटते. ‘कू’ या मायक्रोब्लॉगिंग साईटवर सर्वात अगोदर सक्रिय होणाऱ्यांपैकी मिही एक आहे. ‘कू’ ने ट्विटरची जागा घ्यावी, असे मला वाटते. भारतीय उद्योजक आणि स्टार्टअप्समध्ये ते सामर्थ्य आहे. सध्या संपूर्ण जगच कठीण काळातून जात आहे. हाच काळ भारतासाठी एक संधी आहे. ही संधी भारताने गमवू नये,” असे पीयूष गोयल म्हणाले.

हेही वाचा >>> IND vs NZ 2nd T20: सूर्यकुमारचे वादळी शतक! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर ६५ धावांनी दणदणीत विजय

कू देणार ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी

दरम्यान, भारतीय मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ‘कू’ने ट्विटरच्या माजी कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचे म्हटले आहे. ‘कू’चे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. ‘आम्ही ट्विटरच्या काही माजी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू. जिथे त्यांच्या प्रतिभेची कदर केली जाते तिथे ते काम करण्यासाठी पात्र आहेत,’ असे ट्विट मयंक यांनी केले आहे. तसेच, मायक्रोब्लॉगिंग ही जनतेची शक्ती आहे, ते लोकांच्या दमनासाठी नाही, असेही मयंक यांनी यापूर्वी म्हटलेले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian microblogging koo app should take over twitter said minister piyush goyal prd
First published on: 20-11-2022 at 23:32 IST