Indian origin family deadbodies found in orchard in California at America 8 months baby found dead | Loksatta

अपहरण, हत्या अन् फळबागेत मृतदेह; अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ, जाणून घ्या काय घडलं?

चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचींन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

अपहरण, हत्या अन् फळबागेत मृतदेह; अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ, जाणून घ्या काय घडलं?
(फोटो सौजन्य- मर्सेड काऊंटी पोलीस)

भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचादेखील समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई २७ वर्षीय जसलीन कौर आणि वडील जसदीप सिंग यांचे उत्तर कॅलिफोर्नियातील मर्सेड काऊंटीच्या एका ट्रकिंग कंपनीमधून सोमवारी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर बाळाचे काका ३९ वर्षीय अमनदीप सिंग यांचेही अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मर्सेड काऊंटी पोलिसांनी दिली आहे.

अपहरणकर्त्याचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे.(फोटो सौजन्य- मर्सेड काऊंटी पोलीस)

या चौघांचे मृतदेह इंडियाना आणि हुतचींन्सन रस्त्यावरील एका फळबागेत बुधवारी आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फळबागेतील एका शेतमजुराला हे मृतदेह आढळून आले होते. या घटनेमुळे येत असलेला राग शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शेरिफ वार्न्के या पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. या कुटुंबाचे अपहरण करतानाचा व्हिडीओ पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओत जसदीप आणि अमनदीप हाताला बांधलेल्या अवस्थेत ट्रकिंग कंपनीतून बाहेर पडताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळातच बाळासह जसलीन कौर इमारतीतून अपहरकर्त्यांसोबत बाहेर जाताना दिसत आहेत. या चौघांचे एका ट्रकमधून अपहरण करण्यात आले होते.

मर्सेड काऊंटी पोलीस दलातील अधिकारी शेरिफ वार्न्के यांनी पत्रकार परिषदेत घटनेविषयी माहिती दिली. (फोटो सौजन्य- एपी)

या कुटुंबाच्या अपहरणानंतर ४८ वर्षीय मन्युअल सॅलगाडो या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयित अपहरकर्त्यांने कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या सॅलगाडोवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, सॅलगाडोच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती दिली आहे. जसदीप यांचे आई-वडील डॉ. रणधीर सिंग आणि किरपाल कौर हे पंजाबच्या होशियारपूरच्या तांडा ब्लॉकमधील हरसी पिंड गावचे रहिवासी आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लहान मुलांसाठीच्या ‘या’ चार कफ सिरपचे गंभीर दुष्परिणाम? WHO नं दिला इशारा, भारतात चौकशी सुरू!

संबंधित बातम्या

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज
केंद्रीय व्यापार संघटनांचा अर्थमंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीवर बहिष्कार, ‘या’ मागण्या करत धोरणांवर चर्चेसाठी दिलं खुलं आव्हान
“एवढं वाटतं तर केंद्राकडे फाईल पाठवूच नका, तुमचं तुम्हीच…”, न्यायाधीश नियुक्तीवरून केंद्रीय मंत्री आक्रमक; ‘कॉलेजियम’वर टीकास्र!
भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना
Aftab Lie Detector Test: बालपण, श्रद्धाबरोबरचं डेटींग, त्या रात्री काय घडलं, हत्यार अन्…; आफताबला विचारण्यात आले ५० प्रश्न

व्हिडिओ

ताज्या बातम्या
FIFA World Cup 2022: राष्ट्रगीतासाठी शीख मुलासोबत दिसला ब्राझीलचा कर्णधार नेमार; पाहा व्हिडिओ
पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत
रिचा चड्ढाच्या ‘Galwan says hi!’ ट्वीटवर प्रतिक्रिया देताच अक्षय कुमार ट्रोल, अमित मिश्राचा अभिनेत्याला पाठिंबा, म्हणाला, “माफी मागायला…”
सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
“…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू, त्यांनी फक्त…”, आमदार संजय गायकवाड यांचं जाहीर आव्हान!