Indian scholar Badar Khan Suri detained over alleged ties with Hamas : अमेरिकेतली जॉर्डटाऊन विद्यापीठातील संशोधक बदर खान सुरी यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यानी हमासशी संबंध असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. देशातील महाविद्यालयांच्या आवारातील आंदोलनकर्त्यांविरोधात ट्रम्प प्रशासनाने उघडलेल्या माहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

बदर खान सुरी यांचे माहिती असलेल्या किंवा संशयित दहशतवाद्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात आहे, असे गृह सुरक्षा विभागाच्या सहाय्यक सचिव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी सांगितले. तसेच सुरी हा जॉर्जटाऊन विद्यापीठात फॉरेन एक्सचेंज स्टूडंट होता आणि तो सक्रियपणे सोशल मीडियावर प्रोपगंडा आणि अँटिसेमिटिझम पसरवत होता, अशा माहिती ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

याबरोबरच सुरी याचे हमासच्या वरिष्ठ सल्लागार असलेल्या एका संशयीत दहशदतवाद्याबरोबर जवळचे संबध आहेत. परराष्ट्र सचिवांनी १५ मार्च २०२५ रोजी एक निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार सुरीच्या कारवाया आणि अमेरिकेतील त्याचे वास्तव्य यामुळे तो एएनए कलम २३७(a)(४)(सी)(आय)अंतर्गत देशातून काढून टाकण्यासाठी (Deportable) पात्र ठरवते, असेही त्यांनी सांगितले आहे.

विद्यापीठाने काय म्हटले आहे?

जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय नागरिक आणि पोस्टडॉक्टरल फेलो असणारा हा विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत होता आणि तो शिक्षक म्हणूनही काम करत होता. त्याचे डॉक्टरेटसाठी ‘पीसबिल्डींग इन इराक अँड अफगाणिस्तान (peacebuilding in Iraq and Afghanistan)’ या विषयावर संशोधन सुरू होते.

तो कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी असल्याबद्दल आम्हाला माहिती नाही, तसेच त्याला ताब्यात घेण्यामागील कारण आम्हाला सांगण्यात आलेले नाही. जरी मूलभूत विचार वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह असले तरी, आम्ही आमच्या समुदायातील सदस्यांच्या मुक्त आणि उघड चौकशी, चर्चा आणि वादविवादाच्या अधिकारांचे समर्थन करतो. कायदेव्यवस्था या प्रकरणाचा निष्पक्षपणे निर्णय देईल अशी आमची अपेक्षा आहे, असेही विद्यापीठाच्या निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्नीचा पॅलेस्टाईनशी संबंध

अमेरिकन महिलेशी लग्न केलेला बादर खान सुरी हा सध्या इमिग्रेशन कोर्टात तारीख मिळण्याची वाट पाहतो आहे अशी माहिती त्याच्या वकीलांनी दिली आहे. तसेच त्याच्या याचिकेत म्हटले आहे की त्याचे कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि त्यांच्या पत्नीचे मूळ हे पॅलेस्टिनी असल्यामुळे त्याला लक्ष्य केले जात आहे, असे वृत्त पॉलिटिकोने दिले आहे.