पाकिस्तानच्या कारागृहात गूढ अवस्थेत मरण पावलेले भारतीय कैदी कृपालसिंग यांचा मृतदेह मंगळवारी भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला असला तरी त्यांचे हृदय आणि आतडे गहाळ असल्याचे आढळले आहे.
कृपालसिंगच्या शरीराची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. बाळ यांनी वार्ताहरांना सांगितले की, कृपालसिंगचे हृदय आणि पोट गहाळ झाले असल्याचे आढळले. तथापि, त्याच्या शरीरावर अंतर्गत अथवा बाह्य़ जखम आढळली नाही, असेही डॉ. बाळ म्हणाले. कृपालसिंग याचे मूत्रपिंड आणि यकृत मिळाले असून त्याच्या मृत्यूबाबत माहिती मिळविण्यासाठी या दोन अवयवांचे नमुने अमृतसरबाहेरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत, असे डॉ. बाळ यांनी सांगितले. पाकिस्तानने अद्याप शवविच्छेदन अहवाल पाठविलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian spy karpal singh dead body handed over to india
First published on: 20-04-2016 at 02:28 IST