इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकांचा खूप कमी पैसा स्विस बँकांमध्ये असल्याची माहिती स्वित्झर्लंडंच्या खासगी बँकर्सच्या समूहाने दिली आहे. स्विस बँकेत भारतीयांपेक्षा सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या भागातील पैसा जास्त असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार स्विस बँकेत भारतीयांचे फक्त १.२ बिलियन फ्रँक (सुमारे ८,३९२ कोटी रूपये) आहेत. हा आकडा २०१५ च्या अखेरपर्यंतचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोनच दिवसांपूर्वी ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फर्मेशन (एईओई) अंतर्गत स्वित्झर्लंडने भारत आणि इतर ४० देशांबरोबर बँकिंगविषयक माहिती आदान-प्रदान करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०१९ पासून स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती भारताला मिळू शकेल. स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

मात्र, जिनेव्हा येथील असोसिएशन ऑफ स्विस खासगी बँकेने त्यांना भारताबाबत विशेष चिंता नसल्याचे म्हटले. या संघटनेचे व्यवस्थापक जेन लँगो यांनी स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांचा पैसा खूप कमी असल्याच्या वृत्तास दुजारो दिला.

दरम्यान, स्वित्झर्लंडने एईओई विधेयक संमत केल्यानंतर मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील लढाईला मोठे यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. सत्तेत आल्यानंतरही मोदी सरकारकडून देशातील आणि विदेशातील काळा पैसा खणून काढण्यासाठी सातत्याने अनेक मोहीमा राबवण्यात आल्या होत्या. तसेच स्विस बँकेत दडवून ठेवलेल्या काळ्या पैशांचा माग काढण्यासाठीही सरकारचे अनेक प्रयत्न सुरू होते. मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या करारामुळे आता स्वित्झर्लंडकडून भारताला स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians have very less money in swiss banks says swiss private banks association
First published on: 18-06-2017 at 18:20 IST