महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलपती गिरीशचंद्र वर्मा यांना एका माजी महिला कर्मचाऱ्याचा अनेक वर्षे लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्मा हे महर्षी विद्या मंदिर शाळा समूहाचे अध्यक्ष असून त्यांना या महिलेने नऊ महिन्यांपूर्वी दिलेल्या तक्रारीच्या आधारे अटक करण्यात आली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना विरोध केला. वर्मा यांना भोजपूर रस्त्यावर असलेल्या १० एकरांच्या आश्रमातून ताब्यात घेण्यात आले व जहांगीराबाद पोलीस स्टेशन येथे त्यांचे जाबजबाब घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना भोपाळ येथील महिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक सलीम खान यांनी सांगितले की, त्यांच्यावर कलम ३७६ (बलात्कार) व ५०६ (धमकावणे) हे आरोप ठेवण्यात आले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2013 रोजी प्रकाशित
कुलपती गिरीशचंद्र वर्मा यांना लैंगिक छळ प्रकरणी अटक
महर्षी महेश योगी वैदिक विद्यापीठाचे कुलपती गिरीशचंद्र वर्मा यांना एका माजी महिला कर्मचाऱ्याचा अनेक वर्षे लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

First published on: 31-12-2013 at 12:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore maharishi group of schools chairman held on rape charge