Influencer Sharmishta Panoli gets interim bail : कोलकत्ता उच्च न्यायालयाने २२ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. काही दिवसांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टमधून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली शर्मिष्ठानला अटक करण्यात आली होती.

शर्मिष्ठा पनोली ही पुण्यातील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिवर्सिटीची विद्यार्थी आहे. तिची सोशल मीडियावर मोठी फॉलविंग आहे. तिचे एक्सवर जवळपास ८५,००० फॉलोअर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर ९०,००० इतके जण तिला फॉलो करतात. गेल्या शुक्रवारी दुपारी गुडगाव येथील तिच्या राहत्या घरातून तिला अटक करण्यात आली होती.

एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी शर्मिष्ठाने पोस्ट केलेला एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी इस्लाम धर्माचा अपमान केल्याचा आणि जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या पोस्टमध्ये पठाण यांनी गृहमंत्र्यांना टॅग केले आणि शर्मिष्ठाला अटक करण्याची मागणी केली होती.

शर्मिष्ठाने मागितली होती माफी

दरम्यान सोशल मीडिया पोस्टनंतर वादाला तोंड फुटले होते. यानंतर तिच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आली. अखेर शर्मिष्ठा पनोलीने सोशल मीडियावर बिनशर्त माफी मागितली होती. याचबरोबर इन्स्टाग्रामवरील तिचे व्हिडिओ आणि पोस्टही हटवल्या होत्या.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिष्ठा म्हणाली होती की, “या प्रकरणी मी बिनशर्त माफी मागते. मी जे काही मांडले त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. मी कधीही कोणालाही जाणून बुजून दुखावू इच्छित नव्हते, म्हणून जर कोणी दुखावले असेल तर मी त्याबद्दल माफी मागते. मला सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. यापुढे, मी सार्वजनिक पोस्ट करताना सावध राहीन. पुन्हा एकदा, कृपया माझी माफी स्वीकारा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिच्या विरोधात १४ मे रोजी वाजहत खान यांच्याकडून गार्डनर रिच पोलीस ठाण्यात या प्रकरणात एफआय आर दाखल करण्यात आला होता.