वादग्रस्त अणुकार्यक्रम रद्द करण्याच्या प्रश्नावर इराण व जागतिक समुदाय यांच्यात बोलणी सुरू होण्याच्या अगोदर सहा महिने इराणला राजनैतिक वाटाघाटींसाठी संधी देण्यात येईल तोपर्यंत अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी त्या देशावर आणखी र्निबध टाकण्याचा प्रस्ताव तूर्त रोखून ठेवावा, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. इस्रायल व अमेरिकी काँग्रेसचे सदस्य व आंतरराष्ट्रीय समुदाय व इराण यांना आम्ही असे सुचवतो की, येत्या सहा महिन्यात इराणच्या अण्वस्त्र प्रश्नावर राजनैतिक प्रयत्नांना संधी द्यावी, असे ओबामा यांनी सांगितले. ओबामा म्हणाले की, इराणला अण्वस्त्रे तयार करण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्व मार्गाचा अवलंब करू.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2013 रोजी प्रकाशित
इराणशी आण्विक प्रश्नावर राजनैतिक वाटाघाटींना सहा महिने संधी- ओबामा
वादग्रस्त अणुकार्यक्रम रद्द करण्याच्या प्रश्नावर इराण व जागतिक समुदाय यांच्यात बोलणी सुरू होण्याच्या अगोदर सहा महिने इराणला राजनैतिक वाटाघाटींसाठी संधी देण्यात येईल
First published on: 21-11-2013 at 01:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran has six months period for political negotiations on nuclear question obama