इराणमध्ये अवघ्या तासाभराच्या अवधीत तीन दहशतवादी हल्ले झाले. इराणच्या संसदेत अज्ञातांनी गोळीबार केल्यानंतर इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावर दुसरा हल्ला झाला. तर मेट्रो स्टेशनजवळ तिसरा हल्ला झाला. आयसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये एकूण १२ जण ठार झाले आहेत. इराणच्या सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इराणच्या संसदेत तीन ह्ल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात तीन जण जखमी झाले. ‘तीन हल्लेखोरांनी इराणच्या संसदेत गोळीबार केला आहे. या गोळीबारात तीन जण जखमी झाले. यामध्ये एका सुरक्षा अधिकाऱ्याचा आणि दोन सामान्य नागरिकांचा समावेश आहे,’ अशी माहिती खासदार इलियास हझरती यांनी दिल्याचे एका वृत्तसंस्थेने दिले.

इराणच्या संसदेत नेमक्या किती हल्लेखोरांनी हल्ला केला, याबद्दल इराणच्या प्रसारमाध्यमांमध्ये दोन वेगळ्या प्रकारची वृत्तं दिली होती. इराणमधील वृत्तसंस्थांच्या आधारे रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इराणच्या संसदेत एका हल्लेखोराने गोळीबार केल्याचे वृत्त दिले होते. तर इराणमधील काही माध्यमांनी तीन हल्लेखोरांनी संसदेत गोळीबार केल्याचे म्हटले होते. इराणमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे.

इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या समाधीस्थळावरदेखील गोळीबार झाला. इराणमध्ये झालेला हा दुसरा हल्ला होता. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यासोबतच इमाम खोमेनी मेट्रो स्टेशनजवळ तिसरा हल्ला झाला. अवघ्या तासाभराच्या अवधीत तीन ठिकाणी झालेल्या हल्ल्यांमुळे इराण हादरले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iran parliament attack attackers open fire take hostages injured hostages
First published on: 07-06-2017 at 12:17 IST