इराणच्या एका प्रवासी विमानाचा अपघात झाल्याने ६६जणांचा मृत्यू झाला. ए.पी. या न्यूज एजन्सीने इराण असेमन एअरलाइन्सने या बाबतीत माहिती दिली आहे. इराणच्या दक्षिण भागात या विमानाचा अपघात झाला आहे. हे विमान तेहरानहून यासूज या ठिकाणी चालले होते. या विमानात बसलेल्या ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेहरान येथील मेहराबाद इंटरनॅशनल विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. मात्र त्याचा अपघात झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या विमानात एका लहान मुलासमवेत ६० प्रवासी बसले होते. तर ६ क्रू मेंबर होते. दोन इंजिन असलेले हे विमान कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरले जात होते अशी माहिती असेमन एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने इराण टीव्हीला दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आकाशात काहीसे ढगाळ वातावरण होते त्याचवेळी या विमानाचा अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र त्या कारणाची चौकशी करण्यात येते आहे अशी माहिती असेमन एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान इराणमधील अनेक विमाने जुनी झाली आहेत त्याचमुळे या ठिकाणी विमान अपघातांमध्ये वाढ झाल्याची माहिती मिळते आहे. इराणने एअरबस आणि बोइंग यांच्यासोबत नवी विमाने घेण्यासाठी करार केले आहेत असेही समजते आहे.

या विमानाने जेव्हा उड्डाण केले त्यानंतर काही क्षणातच रडारशी या विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर या विमानाचा अपघात झाला. हे विमान सेमीरोमजवळ कोसळले. मात्र यातील एकही माणूस वाचू शकला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irans aseman airlines says plane crash in southern iran has killed all 66 people on board
First published on: 18-02-2018 at 14:50 IST