या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये आयसिसच्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. आयसिसच्या आत्मघातकी हल्लेखोराने मंगळवारी इस्तंबूलमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात १० जण ठार झाले होते. मात्र या प्रकरणाशी संबंध असल्याने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अंकारा, इझमीर, सीरियाच्या सीमेजवळ असलेले किलीस शहर, सानलिऊर्फा, मेरसीन आणि अदना आदी ठिकाणी छापे टाकून ६५ जणांना अटक करण्यात आली, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. अंकारामध्ये अधिकाऱ्यांनी १५ जणांना अटक केली. त्यांचा राजधानीच्या शहरावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न आहे असा संशय होता, असेही वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सानलिऊर्फा येथे २१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचाही तुर्कस्तानमधील एका अज्ञात स्थळावर हल्ला करण्याचा इरादा होता. बुधवारी अन्ताल्या येथून आणखी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

More Stories onआयसिसISIS
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis 68 suspects arrested in turkestan
First published on: 14-01-2016 at 00:31 IST