गेल्या आठ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासने रॉकेट हल्ला केल्यानंतर युद्धाला तोंड फुटलं आहे. हमासने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्बवर्षाव केला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. तर जवळपास दहा लाख लोक बेघर झाल्याचं बोललं जात आहे.

या घडामोडींदरम्यान, इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझा शहर आणि उत्तर गाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. संबंधित रहिवाशांनी सकाळी १० ते दुपारी एकच्या दरम्यान उत्तर गाझातून तातडीने दक्षिण गाझाच्या दिशेनं प्रवास करावा. रहिवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या काळात ठरवून दिलेल्या मार्गावर इस्रायलकडून हल्ला केला जाणार नाही, असंही इस्रायलकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा- “पुढील आव्हानासाठी तयार आहात? युद्धाचा पुढचा…”, इस्रायली पंतप्रधानांच्या सैनिकांना महत्त्वाच्या सूचना

इस्रायल संरक्षण दलाने ‘एक्स’वर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “गेल्या काही दिवसांत आम्ही गाझा शहर आणि उत्तर गाझामधील रहिवाशांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडील भागात स्थलांतरित होण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सकाळी १० ते दुपारी एकच्या दरम्यान इस्रायल संरक्षण दलााकडून ठरवून दिलेल्या मार्गावर कोणतंही ऑपरेशन केलं जाणार नाही. त्यामुळे कृपया संबंधित तीन तासांत उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्याचा प्रयत्न करा.”

हेही वाचा- असदुद्दीन ओवेसींकडून इस्रायली पंतप्रधानांचा ‘सैतान’ उल्लेख; पंतप्रधान मोदींचं नाव घेत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. कृपया आमच्या सूचनांचे पालन करा आणि दक्षिणेकडे जा. हमासच्या नेत्यांनी आधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे,” असंही इस्रायल संरक्षण दलाने पोस्टमध्ये म्हटलं.