तुर्कस्तानमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आत्मघाती हल्ल्यात ४१ जणांचा मृत्यू, तर २३९ जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री उशिरा तीन आत्मघाती स्फोटांनी इस्तंबुलचे विमानतळ हादरले. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता असून, आयसिस या जहाल दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तुर्कस्तानच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी इस्तंबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेट क्रमांक एकमधून प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात अनेक जण जागीच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तुर्कीमधील भारतीयांना तात्काळ कोणतीही मदत हवी असल्यास केंद्र सरकारने इमर्जन्सी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. कुठल्याही भारतीयाला मदत हवी असल्यास तो पुढील क्रमांकवर फोन करु शकतो.
+90-530-5671095/8258037/4123625

# गोळीबार सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्वरित विमानतळाच्या दिशेने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.

# हल्ल्यानंतर इस्तंबुल विमातळावरील सर्व सेवा विस्कळीत झाली आहे. तुर्कीच्या सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण विमानतळ ताब्यात घेतले आहे.

# जखमींना त्वरित नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Istanbul airport attack live suspected isis bombers kill 36 people more than 100 wounded
First published on: 29-06-2016 at 08:31 IST