देशात सध्या परिवर्तनाची हवा असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि प्रचारकांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना हे दिसून येत असल्याचे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब?
देशातील मतदारांना परिवर्तन हवे आहे, हेच दिसून येत असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत संघाने माहिती दिली आहे. आता त्यांनाच निर्णय घ्यायया आहे. देशातील जनता कोणत्या नेत्याला समर्थन करते, हे स्पष्ट आहे. असे सांगून त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून संघाने अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट केले. देशातील मूड भाजपमधील सर्व वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप संसदीय मंडळाच्या पुढील आठवड्यात होणाऱया बैठकीत मोदी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2013 रोजी प्रकाशित
जनता कोणत्या नेत्याचे समर्थन करते हे स्पष्ट झालंय – राम माधव
देशात सध्या परिवर्तनाची हवा असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि प्रचारकांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना हे दिसून येत असल्याचे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

First published on: 10-09-2013 at 11:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is clear that voters support which leader says ram madhav