पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिल्लीत घेतलेली पत्रकार परिषद ही ते सार्वजनिक जीवनातून निरोप घेत आहेत अशा आशयाची होती, असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
त्याबाबत आणखी काहीही वक्तव्य करता येणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या शर्यतीमध्ये आपण नाही, इतकेच पंतप्रधानांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.
आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत अथवा देशातील एकूणच स्थितीबाबत त्यांनी कोणताही उल्लेख केला नाही किंवा संदेशही दिला नाही, असेही नितीशकुमार
म्हणाले.
पंतप्रधानांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती केली, त्याबद्दल नितीशकुमार यांनी कोणतेही भाष्य केले नाही.