हत्तीने काढलेला ‘सेल्फी’ सोशल मीडियावर व्हायरल
गेल्या वर्षभरात सेल्फीचा क्रेझ भरपूर वाढला आहे. सोशल नेटवर्किंग आणि ‘अॅप’ प्रिय तरुणाई सध्या उत्तमोत्तम सेल्फी काढून प्रोफाईल अपडेट करताना अनोख्या शक्कल लढवताना दिसते. सेल्फीचा क्रेझ आता प्राण्यांनाही आकर्षित करू लागला आहे. ऐकून धक्का बसेल पण, सोशल मीडियावर सध्या एका हत्तीने काढलेला सेल्फी व्हायरल झाला आहे. हत्तीने काढलेल्या या सेल्फीची नेटकरांमध्ये ‘एल्फी’ (Elephant) या नावाने चर्चा रंगली आहे. थायलँडमध्ये शिक्षण घेत असलेला कोलंबिया विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्याने हा ‘एल्फी’ शेअर केला आहे. दक्षिण थायलँडमध्ये कोह फण्गन येथील हत्तींची आपल्या गोप्रो कॅमेराने छायाचित्रे टीपत असताना एका हत्ताने कॅमेरा हिसकावून हा एल्फी टीपल्याचे ख्रिश्चन लेब्लँक याने सांगितले. मात्र, कॅमेरामध्ये विशिष्ट वेळानंतर छायाचित्रे टीपण्याची यंत्रणा आधीपासूनच निश्चित केलेली असल्याने अवधानाने हा एल्फी टीपला गेल्याचेही तो पुढे म्हणाला.
elfi1