केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच सीआरपीएफने जम्मू-काश्मीरध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीमध्ये सीआरपीएफने जम्मू-काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे तर १८३ जणांना ताब्यात घेतलंय अशी माहिती सीआरपीएफचे निर्देशक कुलदीप सिंह यांनी मंगळवारी दिली. सीआरपीएफने १९ माओवाद्यांना ठार केलंय. तर डव्या कट्टरतावादी संघटनेतील ६९९ जणांना वेगवगेळ्या कारवायांदरम्यान या एका वर्षाच्या काळात अटक केल्याचंही कुलदीप सिंह यांनी म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी म्हणजेच १९ मार्च रोजी जम्मूमधील एमए स्टेडियममध्ये सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त विशेष परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली एनसीआरबाहेर पहिल्यांदाच सीआरपीएफच्या स्थापनादिनाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. बुधवारी कुलदीप सिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पहाणी करुन परिस्थिती उत्तम असल्याचं सांगत दिवसोंदिवस त्यामध्ये सुधारणा होत असल्याचं म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: J and k crpf killed 175 terrorists captured 183 since march 1 last year says dg scsg
First published on: 17-03-2022 at 14:41 IST