सप्टेंबर २०१० मध्ये येथील जामा मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा सह-संस्थापक यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी येथील न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. एका कारमध्ये पेरून ठेवण्यात आलेल्या बॉम्बस्फोटाद्वारे हा हल्ला घडवून आणण्यात आला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश दया प्रकाश यांच्याकडे दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने हे आरोपपत्र दाखल केले. भारतीय दंडविधान, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींद्वारे या दोघांविरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्राचा विचार करण्यासाठी पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.
जामा मशिदीवर १९ सप्टेंबर २०१० रोजी दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यानंतर इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांनी ई-मेलद्वारे प्रसारमाध्यमांना संदेश पाठवून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. बाटला हाऊस येथे १९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या चकमकीस दोन वर्षे पूर्ण झाल्याचा ‘मुहूर्त’ साधून जामा मशिदीवर दहशतवादी हल्ला करण्याच्या सूचना रियाझ भटकळ आणि इक्बाल भटकळ यांना पाकिस्तानने दिल्या होत्या आणि त्यावरूनच या हल्ल्याची तामिली करण्यात आली, असे पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
जामा मशिदीच्या तीन क्रमांकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये यासीन भटकळने एका प्रेशर कुकरमध्ये अत्याधुनिक स्फोटके पेरून त्यांचा स्फोट घडवून आणला.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2014 रोजी प्रकाशित
जामा मशीद हल्ला : भटकळवर आरोपपत्र
सप्टेंबर २०१० मध्ये येथील जामा मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा सह-संस्थापक यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार

First published on: 09-05-2014 at 12:10 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jama masjid attack delhi police chargesheets bhatkal aide