scorecardresearch

जम्मू- काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू- काश्मीरमधील बंदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

Loksatta, Loksatta news, loksatta newspaper, marathi news, marathi, Marathi news paper, Marathi news online, Marathi, Samachar, Marathi latest news, national news, national news in marathi, indian army, special forces, conducted, operation, India Myanmar border, Arunachal Pradesh, NSCN K, militant
प्रतिकात्मक छायाचित्र
जम्मू- काश्मीरमधील बंदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरु आहे.

बंदीपोरा येथील जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना गुरुवारी मिळाली होती. यानुसार सकाळी सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम राबवली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. तेव्हापासून परिसरात चकमक सुरु असून शुक्रवारी सकाळीही ही चकमक सुरूच होती. दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.अजूनही चकमक सुरूच असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

चकमक सुरू होताच परिसरात तणाव निर्माण झाला. यामुळे परिसरात सुरक्षा दलांचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jammu and kashmir bandipora encounter two terrorists killed army operations underway

ताज्या बातम्या