काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या असून २८० सैन्याच्या कंपन्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने भारतीय लष्कर आणि हवाई दलाल हाय अलर्टलवर ठेवलं आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि सीमारेषेवर तैनात इतर जवानांना काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.

काश्मीरात सैन्य वाढवलं; कलम ‘३५ ए’ला हात लावू नका, खोऱ्यातील पक्षांचा इशारा

काश्मीर प्रश्न : काय आहे कलम ३५ अ, जाणून घ्या

गुरुवारु संध्याकाळपासूनच भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं जम्मू काश्मीरमध्ये गस्त घालत आहेत. हा ऑपरेशनल अलर्टचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे. जवानांची संख्या वाढवल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही गस्त घातली जात आहे. दरम्यान यावरुन जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ट्विटरवर बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी लिहिलं आहे की, “काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीसाठी लष्कर आणि हवाई दलाला अलर्टवर ठेवण्यात आलं आहे ? हे ३५ अ बद्दल नाही. जर अशा प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आला असेल तर हे काहीतरी वेगळं आहे “.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या २८० कंपन्या म्हणजे तब्बल २८ हजार जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात येत आहेत. यामध्ये सीआरपीएफ जवानांची संख्या जास्त आहे. खोऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येत आहे. गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि प्रशिक्षणासाठी जवानांना खोऱ्यात पाठवत असल्याचं सांगितलं आहे.