अमेरिकेतील स्पेस एक्स कंपनीने उपग्रह पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटचा – प्रक्षेपकाचा पुर्नवापर करत अवकाश मोहिमा स्वस्त केल्या आहेत, उपग्रह प्रक्षेपणा मोहिमांना आता जगात स्पर्धेचे स्वरुप आणले आहे. तेव्हा या स्पेस एक्सला टक्कर देण्यासाठी जपानच्या अवकाश संस्थेने ( Japan Aerospace Exploration Agency -JAXA ) H3 हे रॉकेट विकसित केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जानेवारी महिन्यात या प्रक्षेपकाचे एका टेहळणी उपग्रहासह उड्डाण नियोजित होते. मात्र रॉकेटमध्ये ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण पुढे ढकलण्यात आले. अखेर जपानच्या स्थानिक वेळेनुसार आज दुपारी म्हणजे सात मार्चला याचे उड्डाण नियोजित होते.

नियोजित वेळेनुसार H3 रॉकेटचे उड्डाण झालेही, पहिला टप्पा सुरळीत पार पडला, मात्र पहिला टप्पा संपल्यावर साधारण ३९० किलोमीटर उंचीवर दुसऱ्या टप्पा सुरु होणे आवश्यक होते, मात्र ही प्रक्रिया सुरुच झाली नाही, तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे रॉकेटचा उर्वरित भाग आणि त्यावर आरुढ असलेला उपग्रह असं सर्व हे अवकाशात पृथ्वीभोवती भरकटण्याची शक्यता होती किंवा अशा निकामी झालेल्या रॉकेटचे तुकडे पृथ्वीभोवती वेगाने काही तास फिरल्यावर पृथ्वीवर कोसळण्याची भिती होती. त्यामुळेच जपानच्या अवकाश संस्थने हे रॉकेट नष्ट करण्याचा निर्णय घेतला. रॉकेटवरील संगणकाला तशा सुचना देत हे रॉकेट नष्ट करण्ण्यात आले.

H3 रॉकेटच्या पहिल्याच उड्डाणात आलेले अपयश हे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जपानच्या अवकाश संस्थने दिली आहे. यामुळे भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमांवर परिणाम होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japan jaxa destroyed its own rocket h3 in a few seconds after take off what exactly happened asj
First published on: 07-03-2023 at 18:42 IST