जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचं युद्ध विमान एफ-१५ बेपत्ता झालं आहे. सोमवारी उड्डाण केल्यानंतर हे फायटर जेट रडावरवरुन गायब झालं. या विमानाने मध्य जपानमधील कोमत्सु एअरबेसवरुन उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी म्हणजेच पाच किमी अंतर कापल्यावर हे विमान जपानच्या समुद्रावर असताना रडारवरुन गायब झालं.

समोर आलेल्या माहितीनुसार या विमानामध्ये दोन क्रू मेंबर्स होते. हे जेट ट्रेनिंगसाठी वापरलं जात होतं. या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र अधिकृतरित्या यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

प्राथमिक पहाणीमध्ये ज्या ठिकाणाहून या विमानाचा संपर्क तुटला तेथे समुद्रात काही गोष्टी तरंगताना आढळून आल्यात. सध्या तज्ज्ञांचा एक गट या विमानाचा शोध घेत आहे. तपासामध्ये काय माहिती समोर येते यावरुनच हा विमानाचं नक्की काय झालं हे सांगता येणार आहे.

जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हे फायटर जेट त्या स्क्वाड्रनचा भाग होतं जे प्रशिक्षणादरम्यान शत्रूचं विमान म्हणून सहभागी व्हायचं. सध्या या विमानाचा शोध घेण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इशिकावा प्रांतामधील कोमत्सु एअरबेसवरुन उड्डाण केल्यानंतर हे विमान समुद्राच्यावर गेल्यानंतर रडारवरुन बेपत्ता झालं. मंत्रालयाने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार या विमानाचा अपघात झालाय. सध्या शोध मोहीम सुरु आहे. जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्सचं एप-३५ ए स्टील्थ जेट २०१९ साली समुद्रामध्ये पडलं होतं. या विमानाचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याचं पहायला मिळतंय.