भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे सदस्य प्रकाश जावडेकर यांची मंगळवारी पक्षाचे राज्यसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या संसदीय मंडळाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ही माहिती दिली.
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक मंगळवारी झाली. त्यावेळी अडवाणी यांनी जावडेकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भाजपच्या राज्यसभेतील मुख्य प्रतोद मायासिंग राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ग्वाल्हेर पूर्व मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या जागेवर जावडेकर यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली.