कॅप्टनला मारहाण; बंडाच्या वृत्ताला लष्कराचा नकार
अरुणाचल प्रदेशात रविवारी लष्कराचा एक जवान नियमित प्रशिक्षणादरम्यान मरण पावला. यानंतर चिडलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी एका कॅप्टनला मारहाण केली.
या जवानाने संचलनापूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. युनिटच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी करून तो ‘फिट’ असल्याचे सांगितले. त्यानंतर संचलन करताना हा जवान कोसळला. त्याला त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले असता तो मरण पावला. आपल्या सहकाऱ्याचा तडकाफडकी मृत्यू झाल्याचे पाहून पाच-सहा जवान भावनोत्कट झाले आणि त्यांनी त्यांना समजावणाऱ्या समादेशक सहायक (अॅडजुटंट) कॅप्टनला मारहाण केली. मात्र हा बंडाचा प्रकार नसून यात कुणीही जखमी झाले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रशिक्षणादरम्यान होणाऱ्या मृत्यूच्या इतर प्रकरणांसारखा या प्रकरणाचा तपास केला जात असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2016 रोजी प्रकाशित
प्रशिक्षणादरम्यान जवानाचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशात रविवारी लष्कराचा एक जवान नियमित प्रशिक्षणादरम्यान मरण पावला.
First published on: 16-05-2016 at 00:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawan dies during training