संयुक्त जनता दलाचे नेते व दिल्ली विधानसभेवर पाच वेळा विजयी झालेल्या शोएब इक्बाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जातीय शक्तीचा मुकाबला करण्यासाठी तसेच मुस्लीम मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे शोएब यांनी सांगितले. दिल्ली काँग्रेसचे प्रभारी शकील अहमद व  दिल्ली अध्यक्ष अरविंदसिंग लवली यांच्या उपस्थितीत इक्बाल यांनी काँग्रेसप्रवेश केला. यामुळे काँग्रेस मजबूत होईल, असा दावा शकील अहमद यांनी केला. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर इक्बाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu leader shoaib iqbal joins congess
First published on: 21-11-2014 at 04:17 IST