JDU leader Upendra Kushwahas convoy attacked in Bhojpur msr 87 |Upendra Kushwaha : ‘जदयू’चे नेते उपेंद्र कुशवाहांच्या वाहन ताफ्यावर जगदीशपूरमध्ये हल्ला! | Loksatta

Upendra Kushwaha : ‘जदयू’चे नेते उपेंद्र कुशवाहांच्या वाहन ताफ्यावर जगदीशपूरमध्ये हल्ला!

हल्ल्याच्या घटनेबाबत कुशवाह यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती, म्हणाले…

Upendra Kushwaha
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स)

जनता दल यूनायटेडचे नेते उपेंद्र कुशवाह यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला झाला आहे. कुशवाह यांनी आरोप केला आहे की, भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूरमध्ये नायका टोल नाक्यावरील वळणावर त्यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला दगडफेक करण्यात आली.

या हल्ल्यात सुदैवाने कुशवाह यांना कोणतीही दुखापत झाली नाही. याशिवाय कुशवाह यांना काही ग्रामस्थांनी काळे झेंडेही दाखवल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्याच्या घटेनबाबत माहिती देताना कुशवाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काही समाजकंटकांनी दगडफेक केली. घटनास्थळी जेव्हा सुरक्षा रक्षक पोहचले तेव्हा हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.

हल्ल्या झाल्याची माहिती नाही – तेजस्वी यादव

जदयू नेते उपेंद्र कुशवाह यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला झाल्याच्या घटनेवर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे याबाबत काही माहिती आलेली नाही, जर असं काही घडलं असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 21:46 IST
Next Story
संजय राऊत यांच्या धमकीमुळे शिवसेनेचे आमदार पळून गेले? काय म्हटलं आहे शिंदे गटाने लेखी युक्तिवादात?