पनवेल : जानेवारी महिन्यात कुंडेवहाळ येथील खदाणीमध्ये सूरुंग स्फोटात एकाचे प्राण गेल्याचे घटना ताजी असताना पनवेल शहर पोलीसांनी रविवारी दुपारी दिड वाजता कुंडेवहाळ येथील बंबावीपाडा येथील एक खदाणी बेकायदा सूरुंग स्फोट करताना कारवाई केली. महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पनवेल शहर पोलीसांना ही कारवाई करावी लागली आहे. स्वराज या कंपनीने पनवेलमधील ८० पैकी ५० हून अधिक खदाणी मालकांसोबत करार करुन त्यांच्या खदाणी स्वताच्या अखत्यारीत घेतल्या.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कामगाराने मित्राच्या मदतीने केली चोरी 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वराज कंपनीसोबत केलेल्या वाढिव दराच्या करारामुळे खदाणीमालकांचे फावले मात्र त्यामुळे पनवेल व उरणच्या खदाणीमधून निघणा-या बांधकाम साहीत्याचे दर दुप्पटीने वाढले. याचा फटका बांधकाम व्यवसायिकांना बसला. मात्र या सर्व दरवाढीमुळे खदाण व्यवसाय सर्वाधिक चर्चेत आला. जानेवारी महिन्यात कुंडेवहाळ येथील अॅन्थोनी भोईर यांच्या खदाणीमधील स्फोटातील अपघातामध्ये पोकलेन चालक ठार झाला तर दोन कामगार जखमी झाले. त्यामुळे खदाणीमधील सूरक्षेचा प्रश्न एरणीवर आला. महसूल आणि पर्यावरण विभागाची या खदाणींवर देखरेख असणे गरजेचे आहे. मात्र या विभागांकडील दुर्लक्षामुळे पनवेल शहर पोलीसांनी या खदाणींमधील सूरुंग स्फोटात वापरले जाणारे परवान्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पोलीसांनी रविवारी दुपारी कुंडेवहाळ येथील खदाणीवर केलेल्या कारवाईत खदाण पर्यवेक्षक बाळासो लिगाडे, लोकेश राठोड, खदाण चालक नंदकुमार मुंडकर यांच्यावर भादवी कलम २८६ प्रमाणे सह स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ चे कलम ९ ब प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. पोलीसांनी विनापरवाना खदाणीमध्ये स्फोट घडविताना एक्सपोटर खोका, डेटोनेटर वाहिनी, जिलेटीनच्या कांड्या जप्त केल्या आहेत.