भ्रमणध्वनी बाजारपेठेत ‘अॅपल’ला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे जेफ विल्यम्स यांची कंपनीच्या ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’पदी (सीओओ) नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीसोबत कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातदेखील फेरबदल करण्यात आले आहेत. संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांच्यानंतर टीम कुक यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ‘सीओओ’पद रिक्तच होते. विल्यम्स यांनी १९९८ मध्ये खरेदी विभाग प्रमुख म्हणून कारकीर्द सुरू केली. ‘अॅपल वॉच’च्या निर्मितीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्यासह जॉनी स्त्रॉजी, फिल शिलर, तोर मायरेन यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘अॅपल’च्या ‘सीओओ’पदी जेफ विल्यम्स यांची नियुक्ती
भ्रमणध्वनी बाजारपेठेत ‘अॅपल’ला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारे जेफ विल्यम्स यांची कंपनीच्या ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’पदी (सीओओ) नियुक्ती झाली आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 18-12-2015 at 00:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeff williams new ceo of apple company