झारखंडमध्ये एका मुलीने थेट मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला शिकण्याची इच्छा असून मदत करण्याची विनंती केली. लोकसंवाद कार्यक्रमात मुलीने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. यानंतर पुढील ४८ तासात त्या विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबाला अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करत ‘हा भाऊ तुझ्यासोबत आहे, तू खूप शिक’ असं म्हणत पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणारी ही मुलगी गढवा येथील तिलदागमध्ये वास्तव्यास आहे. बेबी कुमारी असं या मुलीचं नाव असून, तिला सरकारी मदत देण्यात आली आहे. बेबी कुमारीला सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत मदत करण्यात आला असून आणि तिच्या बहिणींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तसंत तिच्या आईला बकरी पाळण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन विकास योजनेशी जोडण्यात आलं आहे.

बेबी कुमारीचे वडील इंद्रेश राम यांना मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेंतर्गत पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय बेबी कुमारीची बहिण रिमझिमला कस्तुरबा गांधी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

सरकारी मदत मिळाल्यानंतर बेबी कुमारीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितल्यानंतर काही तासातच सरकारी योजनांचा लाभ मिळाला असल्याचं तिने म्हटलं आहे. बेबी कुमारीने आपली मोठं होऊन शिक्षक होण्याची इच्छा असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय झालं होतं?

गढवा येथील तिलदागमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बेबी कुमारीने मुख्यमंत्र्यांकडे आपली शिकण्याची इच्छा असून, मदत करण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बेबी कुमारी आणि तिच्या कुटुंबाला वेगवेगळ्या योजनांशी जोडण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ४८ तासातच कुटुंबाला मदत करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand chief minister hemant soren who had requested to help in study sgy
First published on: 12-12-2022 at 08:08 IST