नवी दिल्ली : उत्तराखंडमधील जोशीमठ हे शहर केवळ १२ दिवसांत ५.४ सेंटिमीटर इतक्या जलद वेगाने खचल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जारी केलेल्या उपग्रह छायाचित्रांतून दिसून आले आहे. २ जानेवारीला भूपृष्ठ खचण्याच्या घटनेमुळे असे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बद्रीनाथ व हेमकुंड साहिब यांसारखी तीर्थस्थळे आणि औली हे आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्थळ यांचे प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठपुढे जमीन खचण्यामुळे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान जमीन खचण्याची गती कमी होती व या काळात जोशीमठ ८.९ सेंटिमीटरने खचले, असे इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राच्या (एनआरएससी) प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र २७ डिसेंबर २०२२ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत भूपृष्ठ खचण्याची तीव्रता वाढली आणि केवळ १२ दिवसांत हे शहर ५.४ सेंटिमीटरने खचले. याची छायाचित्रे काटरेसॅट-२ एस उपग्रहामार्फत घेण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joshimath sank 5 4 cm in just 12 days says isro zws
First published on: 14-01-2023 at 02:37 IST