पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ज्या सहा जणांना अटक झाली आहे त्यात ज्योती मल्होत्रा ही युट्यूबरही आहे. ट्रॅव्हल विथ जो नावाचं युट्यूब चॅनल चालवणारी ही युट्यूबर आहे. दरम्यान आता तिच्या एका व्हिडीओत तिने पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचा पुरावा मिळाला आहे. दरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्याबाबत आता माहिती दिली आहे.

ज्योतीसारख्या व्लॉगर्सचा उपयोग ॲसेट म्हणून झाला

हरियाणाची युट्युबर ज्योती मल्होत्राला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती हिचे पाक दुतावासातील मूळ भारतीय वंशांच्या नागरिक दानिश याच्याशी संपर्क आला होता, त्या दोघांचे चांगला परिचय झाला होता.ज्योती मल्होत्राच्या उत्पन्नापेक्षा ट्रॅव्हल व्लॉगचा खर्च जास्त होता. तरुण पिढीला काही कळत नाही कोणाकडून प्रेरणा घ्यावी, तिच्या सारख्या नागरिकांचा शत्रू राष्ट्रं अॅसेट म्हणून वापर करतात असे हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे.

ज्योतीची कसून चौकशी सुरु आहे

ज्योती पहलगाम हल्ल्यावेळी पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती अशी माहीती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. PIO नागरिक अनेक सोशल मीडियावरील इनफ्लुएंसरला आकर्षित करीत आहेत. आम्ही ज्योतीची कसून चौकशी करीत आहोत, तिच्या आर्थिक व्यवहाराची आम्ही माहिती घेत आहोत. ज्योती चीनला सुध्दा गेली होती. पहलगाम हल्ल्यावेळी ती पाकिस्तानी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ज्योती मिलीट्री आणि पोलिसांच्या थेट संपर्कात नव्हती म्हणून जास्त माहिती काय तिच्याकडे नाही

तिच्या उत्पन्नापेक्षा व्लॉगचा खर्च जास्त होता-पोलीस

उत्पन्नापेक्षा तिच्या ट्रॅव्हल व्लॉगचा खर्च होता, तरुण पिढीला काही समजत नाही की ते कुणाकडून प्रेरणा घेत आहेत. ती तिच्या व्लॉगच्या कंटेंटसाठी पाकिस्तानला गेली होती.पाकिस्तानचे अधिकारी तिचा एसेट म्हणून वापर करत होते. मॉर्डन वॉरफेअरमध्ये फक्त मैदानातील लढाई नसते. लढाईच्या वेळी छोटीशी माहिती सुध्दा धोकादायक ठरवू शकते. पहलगाम हल्ल्याअगोदर ती पहलगामला गेली होती, नंतर ती पाकिस्तानला गेली होती. या तिच्या लिंकबद्दल आम्ही अधिक तपास करतोय, तिच्या म्हणण्याप्रमाणे काहीजण पाकिस्तानींना मदत करत होते. त्याचाही तपास आम्ही करीत आहोत असेही या अधिकाऱ्याने सांगितले.तसंच ती चीनलाही गेली होती असंही पोलिसांनी सांगितलं.


ज्योती मल्होत्राविरोधात संताप

ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर आता तिच्या जुन्या फोटो आणि व्हिडीओवरून काही अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकजण तिचे जुने फोटो शेअर करत आरोप करत आहेत. तिचा पहलगाम भेटीचा एक फोटो एका युजरने शेअर केला आहे. ज्योतीने पहलगामची रेकी केली होती का? असा प्रश्न या युजरने उपस्थित केला आहे.