अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल मीडियावर नवा वाद सुरु झाला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली. विरोध करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी कंगनाचा विरोध करणारी करणी सेना आता तिला पाठिंबा देत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार करणी सेनेचा कंगनाला पाठिंबा असून ९ सप्टेंबर रोजी करणी सेनेचे काही सदस्य मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहतील. इतकंच नव्हे तर मुंबई विमानतळावरून तिच्या घरापर्यंत करणी सेनेचे सदस्य तिला सुरक्षा पुरवणार आहेत. मुंबई दौऱ्यादरम्यान कंगनाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार असल्याचं करणी सेनेचे जीवन सोलंकी यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा : रियाने एनसीबीच्या चौकशीदरम्यान उघड केली बॉलिवूडमधली मोठी नावं

कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी करणी सेनेकडून कंगनाला धमक्या देण्यात आल्या होत्या. या चित्रपटावर करणी सेनेने आक्षेप घेतला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut gets support from the karni sena ssv
First published on: 07-09-2020 at 16:08 IST