समोरच्यांना काय वाटेल, याची फिकीर न करता बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने परस्परविरोधी मतं मांडण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे. समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या मताचा विरोध करणे, त्यावर टीका करणे यामध्ये काहीही चुकीचे नसल्याचे तिने सांगितले. नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवेळी तिने हे उत्तर दिले.
‘तनू वेड्स मनू’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली कंगना राणावत सध्या विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘रंगून’ चित्रपटात काम करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सैफ अली खान आणि शाहिद कपूर हे सुद्धा असणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2016 रोजी प्रकाशित
कंगना म्हणते, परस्परविरोधी मत मांडण्यात गैर काय?
समोरच्या व्यक्तीने मांडलेल्या मताचा विरोध करणे, त्यावर टीका करणे यामध्ये काहीही चुकीचे नाही
Written by वृत्तसंस्था
Updated:

First published on: 03-02-2016 at 16:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana says nothing wrong in having contradictory opinions