मोदीजी कोणत्याही गाडीला चार चाकं असतात आणि ती चाकं ठप्प झाली तर गाडी चालत नाही. सरकारचंही तसंच आहे असं म्हणत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले आहेत कपिल सिब्बल?

“सरकारची जी व्यवस्था त्याची चार चाकं असतात पहिलं चाक आहे संसद तिथे तुम्ही कधीही उत्तर देत नाही. दुसरं चाक आहे सरकार ते तुम्ही तुमच्या मनमानीने चालवता, तिसरं चाक आहे न्यायव्यवस्था जिथे जाऊन सरकार सांगंत की रस्त्यावर कुणी प्रवासी नाहीत. चौथं चाक आहे निवडणूक आयोग.. तिथे तेच होतं जे तुम्ही सांगता. ही चारही चाकं चालत नाहीत. तुम्ही चालकाच्या भूमिकेत आहात. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सगळ्यांना ठाऊक आहे.” असं म्हणत कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहेत.

देशाची आर्थिक अवस्था काय आहे? याची माहिती ना पंतप्रधान मोदींना आहे किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.