कराची शहरात एका तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या बसगाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरच करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने स्वीकारली आहे.
कराची शहराजवळच असलेल्या शाह लतीफ येथे प्रशिक्षण केंद्राबाहेर ही बस येताच आत्मघातकी हल्लेखोराने त्या बसला लक्ष्य केले. सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांना घेऊन ही बस जात असताना हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.या हल्ल्यात ११ पोलिसांसह दोन नागरिक ठार झाले. या हल्ल्यात अन्य ५० जण जखमी झाले असून त्यापैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2014 रोजी प्रकाशित
कराचीत पोलीस बसगाडीवर आत्मघातकी हल्ल्यात १३ ठार
कराची शहरात एका तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या बसगाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले.
First published on: 14-02-2014 at 02:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karachi explosion kills 13 policemen injures