Sanjay Kapoor Ex Husband Of Karishma Kapoor: दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या आईने त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मुलाचा मृत्यू “संशयास्पद” असल्याचे म्हटले असून, “डोळ्यांना जे दिसत आहे त्यापेक्षा हे प्रकरण खूप वेगळं आहे”, असा दावा केला आहे. सोना कॉमस्टारचे अध्यक्ष संजय कपूर यांचे जूनमध्ये निधन झाले होते, परंतु त्यांच्या आईने आता सार्वजनिकरित्या सांगितले आहे की, त्यांना “मुलाच्या मृत्यूबद्दल समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.”

दरम्यान, संजय कपूर यांच्या आईने त्यांच्या चिंता लक्षात घेऊन कंपनीची आगामी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. नियमित कामकाज सुरू ठेवण्यापूर्वी या प्रकरणाची सखोल तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या आरोपांमुळे कंपनीचे कामकाज आणि संजय कपूर यांच्या अचानक मृत्यूमागील कारणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दिवंगत संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांच्या दिवंगत पतीच्या मृत्युपत्रानुसार सोना ग्रुपमध्ये त्यांच्याकडे बहुसंख्य मालकी आहे.

संजय कपूर यांचे जूनमध्ये इंग्लंडमध्ये पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

कोण होते संजय कपूर?

संजय कपूर यांनी नंदिता महतानीशी घटस्फोट झाल्यानंतर २००३ साली करिश्मा कपूरशी लग्न केलं. या जोडप्याला समायरा व कियान ही दोन अपत्यं आहेत. त्यानंतर संजय यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं होतं. डिसेंबर २०१८ मध्ये या जोडप्याला मुलगा झाला. प्रियाला तिच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी असून ती त्यांच्यासोबतच राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिश्मासोबतच्या घटस्फोटानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी या जोडप्याने पाच वर्षं डेटिंग केली. नंतर त्यांना अझरियास कपूर नावाचा मुलगा झाला. घटस्फोटादरम्यान करिश्मा कपूरने संजय कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते, ज्यात घरगुती हिंसाचार, शारीरिक आणि मानसिक छळ यांचा समावेश होता.