Karnatak Election 2023 Exit Polls Updates : कर्नाटकमध्ये आज (१० मे ) विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान पार पडलं. आता कर्नाटकमध्ये भाजपा किंवा काँग्रेसची एकहाती सत्ता येणार की जेडीएस किंगमेकर ठरणार? हे १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी अनेक जनमत कल (एक्झिट पोल) जाहीर होत आहेत. या जनमत चाचणीमध्ये भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसला किती जागा मिळेल यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा – Karnataka Election 2023 : “मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून…”, कर्नाटक मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले…

झी न्यूज आणि मॅट्राईजच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ७९ – ९४
काँग्रेस : १०३ – ११८
जेडीएस : २५ – ३३
अन्य : २-५

टीव्ही ९ भारतवर्ष आणि पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८८ – ९८
काँग्रेस : ९९ – १०९
जेडीएस : २१ – २६
अन्य : ० – ४

हेही वाचा – विश्लेषण : कर्नाटकात जातींच्या समीकरणावरच निकालाचे गणित? कोणत्या जाती कुठे प्रभावी?

रिपब्लिक टीव्ही- पीएमएआरक्यू एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८५ – १००
काँग्रेस : ९४ – १०८
जेडीएस : २४ – ३२
अन्य : २ – ६

सूवर्ण न्यूज-जन की बात एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ९४ – ११७
काँग्रेस : ९१ – १०६
जेडीएस : १४ – २४
अन्य : ० – २

न्यूज नेशन-सीसीएस एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ११४
काँग्रेस : ८६
जेडीएस : २१
अन्य : ३

हेही वाचा – karnataka election 2023 : प्रचार संपला आता मतदान आणि निकालाकडे लक्ष; ‘हे’ मुद्दे ठरवणार कोण जिंकणार?

सी-वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?

भाजपा : ८३ – ९५
काँग्रेस : १०० – ११२
जेडीएस : २१ – २९
अन्य : २ – ६

हेही वाचा –

दरम्यान, भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास आहे. तर दुसरीकडे आम्हीच सत्तेत येऊ, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तर २०१८ प्रमाणे आपण किंगमेकर ठरू शकतो अशी जेडीएसला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.