नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात पण तेच एकप्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात. स्वत: नरेंद्र मोदी एक भ्रष्टाचार आहेत असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकात येडियुरप्पा सरकार कोसळल्यानंतर ते पत्रकारपरिषदेला संबोधित करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटक विधानसभेच्या सत्राचे राष्ट्रगीताने समापन होणार होते पण त्याआधीच भाजपा आमदार आणि हंगामी सभापती सभागृहाबाहेर पडले. सत्तेत असल्यानंतर आम्ही कुठल्याही संस्थेचा अनादर करु शकतो हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले. सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य घटनात्मक संस्थांचा भाजपा आदर करत नाही असा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्ष एकत्र राहिला आणि आम्ही भाजपाचा पराभव केला यापुढे सुद्धा असाच भाजपाचा पराभव करु असे राहुल गांधी म्हणाले. भाजपाने कर्नाटक, गोवा आणि मणिपूरच्या जनादेशाचा अनादर केला असे राहुल म्हणाले. आम्ही कर्नाटकात लोकशाहीवरील आक्रमण रोखले, यापुढेही आम्ही भाजपा, आरएसएसला रोखणार आणि देशातील जनतेचा आवाज दबू देणार नाही असे राहुल म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka floor test rahul gandhi blame bjp
First published on: 19-05-2018 at 17:10 IST