‘करवा चौथ’ सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हिंदू महासभेने मुस्लीम मेहंदी कलाकारांना गंभीर इशारा दिला आहे. मुस्लिमांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेहंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे हिंदू महासभेने म्हटले आहे. मेहंदीची दुकानं उघडणाऱ्या मुस्लीम तरुणांचे मनसुबे वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे, असा आरोप खतौलीचे भाजपा आमदार विक्रम सैनी यांनी केला आहे.

“नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकोणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा

“मेहंदीकामाच्या आड मुस्लीम युवक ‘लव्ह जिहाद’ चालवत आहेत. अशाप्रकारची अनेक प्रकरणं घडली आहेत. माझी हिंदू महिलांना विनंती आहे की त्यांनी एकतर घरी अथवा इतर समाजातील व्यक्तींच्या ब्युटी पार्लर, दुकानांमध्ये जाऊन मेहंदी काढावी”, असे सैनी यांनी म्हटले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुझफ्फरनगरमध्ये १३ मेहंदीची दुकानं लावली आहेत. या परिसरात मुस्लीम युवकांकडून हिंदू महिलांच्या हातावर मेहंदी काढली जाणार नाही, याची खबरदारी कार्यकर्ते घेत आहेत. मेहंदी कलाकारांच्या आधार कार्डद्वारे ओळख पटवण्याचाही प्रयत्नही विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

लव्ह जिहादला बळी पडण्यापासून आमच्या बंधू आणि भगिनींना वाचवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे हिंदू महासभेचे सदस्य लोकेश सैनी यांनी म्हटले आहे. ज्या दुकान मालकांना करवा चौथचे महत्त्व आहे, त्यांच्याचकडे हिंदू महिलांनी मेहंदी काढण्यासाठी जावं, असे आवाहन सैनी यांनी केले आहे. दरम्यान, २०२१ मध्येही मुझफ्फरनगरमध्ये काही समाजघटकांकडून मुस्लिमांना मेहंदी काढण्यापासून रोखण्यात आले होते. या लोकांवर पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.

BYJU’S To Lay Off Employees: ‘बायजू’ अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, नेमकं कारण काय जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय महिलांसाठी ‘करवा चौथ’ हा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला निर्जळी उपवास करतात. या सणासाठी साज श्रृंगार करत विवाहित महिला हातावर मेहंदी काढतात.