विख्यात वाद्यवृंदकार झुबिन मेहता आणि बवेरिअन स्टेट ऑर्केस्ट्रा यांच्या संगीत कार्यक्रमानंतर चार दिवसांनी श्रीनगरमधील लाल चौकाजवळील शेर-ए-काश्मिर पार्काजवळ बुधवारी ‘जम्मू आणि काश्मिर संघटित नागरिक सोसायटी’तर्फे संसदेवर हल्ला करणा-या अफझल गुरूलाला श्रध्दांजली वाहण्यासाठी ‘हकिकत-ए-काश्मिर’ या नावाने एका म्युझिक अल्बमची घोषणा करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी तिहार कारागृहात अफझल गुरूला फाशी देण्यात आली होती.
कला, संस्कृती आणि संगीताला काश्मिरमध्ये वाईट पध्दतीने लोकांसमोर सादर केलं जात आहे, हे खोटे आहे. आम्हाला कला आणि संगीताच्या माध्यामातून काश्मिरचे प्रश्न लोकांसमोर मांडायचे आहेत. ‘हकिकत-ए-काश्मिर’प्रमाणे संगीताद्वारे आम्ही आमचे म्हणणे योग्य पध्दतीने मांडू शकतो, असं संघटित नागरिक सोसायटीचे खुराम परवेझ म्हणाले.      
‘जागतिक शांतता दिवस’ (२१ सप्टेंबर) रोजी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये या अल्बमचे अनावरण करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात या अल्बमवर काम करण्यास सुरूवात झाली आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला मध्य काश्मिरमधील स्टुडिओत या अल्बमचे काम पूर्ण झाले.
या अल्बममध्ये कश्मिरी आणि उर्दू भाषेतील एकूण आठ गाण्यांचा समावेश आहे. ही गाणी नव्या दमाच्या कवींनी लिहिली असून तीन गायकांनी ती स्वरबध्द केली आहेत. इंटरनेटवर हा अल्बम मोफट डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.
या अल्बमला कुणाचे सहाय्य लाभले यांची नावे जाहीर करण्यास मात्र परवेझ यांनी नकार दिला. या अल्बमचे कवी आणि गायक अनावरण सोहळ्याला उपस्थित असतील आणि आम्ही तेव्हाच त्यांची ओळख जाहीर करू, असंही ते पुढे म्हणाले.
काश्मिरमधील अनेक लोकांना अफझल गुरूची फाशी विसरायची आहे. त्यामुळेच हा अल्बम म्हणजे अफझल गुरूला कलात्मक श्रध्दांजली असणार आहे. कश्मिर-ए-हकिकतद्वारे अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही लवकरच ७ सप्टेंबरला झालेल्या कार्यक्रमाची ध्वनिमुद्रीत सीडी बाजारात आणणार आहोत, असं परवेझ म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmir group to release music album as tribute to afzal guru
First published on: 12-09-2013 at 11:12 IST