Ban non-Hindus at Kedarnath : उत्तराखंडच्या भाजपा नेत्या आशा नौटियाल यांनी केदारनाथ मंदिरात गैर-हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. केदारनाथ येथील आमदार नोटियाल यांनी आरोप केला आही हिंदू नसणारे लोक या धार्मिक स्थळाच्या पावित्र्याला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांनी भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्य करण्याची सवय असल्याचे म्हटले आहे.

“काही गैर हिंदू घटक हे केदारनाथ धामच्या पावित्र्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे नौटियाल म्हणाल्या आहेत. केदारनाथ येथे मांसाहार, मासे किंवा मद्य दिले जात आहे का? याबद्दल विचारले असता नौटियाल यांनी हे सखोल चौकशीनंतरच हे कळू शकेल असे उत्तर दिले.

“जर काही लोक असे काही करत असतील ज्यामुळे केदारनाथ धामची प्रतिमा घराब होईल तर त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली पाहिजे. ते निश्चितपणे बाहेरून येणारे गैर-हिंदू आहेत जे बाहेरून येथे येतात आणि धामची बदनामी करण्यासाठी अशा गोष्टी करू लागतात,” असेही नौटियाल म्हणाल्या.

नौटियाल यांनी नमूद केले की, या प्रकरणी मंत्री सौरभ बहुगुणा यांनी स्थानिक प्रशासन आणि रहिवाशांबरोबर बैठक घेतली. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, या बैठकीत काही सहभागींनी सुचवले की काही गैर-हिंदू व्यक्ती हे केदारनाथ मंदिराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची ओळख पटवून त्यांच्या मंदिराच्या परिसरातील प्रवेशावर बंदी घातली पाहिजे असेही नौटियाल म्हणाल्या.

नौटियाल यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिष रावत म्हणाले की, “भाजपा नेत्यांना खळबळजनक वक्तव्ये करण्याची सवय आहे. उत्तराखंड ही ‘देवभूमी’ आहे आणि कुठंपर्यंत तुम्ही सर्व काही धर्माशी जोडाल? ते हे सर्व करत आहेत कारण त्यांच्याकडे लोकांना सांगण्यासाठी काहीही नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर ३० एप्रिलपासून चार धाम यात्र सुरू होणार आहे , या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जातील. केदारनाथ धामचे दरवाजे हे २ मे रोजी तर बद्रिनाथ धामचे ४ मे रोजी उघडतील.