बाबा केदारनाथ यांच्या दर्शनाची आतूरता आता संपली आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे केदारनाथ मंदिर बंद होते. परंतु अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. तसेच आज शुक्रवारी सकाळी ६.२५ वाजता शुभ मुहूर्तावर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी पहिली पूजा ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने करण्यात आली. आज केदारधाममध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.  

भाविकांना करता येणार पूजा

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण

करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून केदारनाथ मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता मंदिराचे दरवाजे उघडल्यामुळे भाविकांना दर्शनासोबतच पूजाही करता येणार आहे.

शंकराचार्यांच्या मूर्तीचेही घेता येणार दर्शन

केदारनाथ धाममध्ये प्रथमच आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीत शंकराचार्यांच्या मूर्तीचे दर्शनही भाविकांना पाहायला मिळणार आहे. २०१३ च्या महापूरात ही जागा नष्ट झाली होती, जी पुन्हा बांधण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी या समाधीस्थळाला भेट दिली होती.

देश-विदेशातून हजारो भाविक दाखल

देश-विदेशातून हजारो भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचले आहेत. थंडी असूनही मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वीच गुरुवारी रात्री उशिरापासून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सकाळी सरस्वती नदीपर्यंत भाविकांची गर्दी दिसून आली. यावेळी सेल्फी आणि फोटो काढण्याची स्पर्धाही लोकांमध्ये पाहायला मिळाली. अनेकजण आपल्या कुटुंबीयांना फोनवरून बाबांचे दर्शन देताना दिसत होते.

उत्सवास सुरूवात

गुरुवारी बाबांची चालविग्रह उत्सव डोली केदारनाथ धाम येथे पोहोचली. हजारो भाविक ​​आणि भोलेनाथच्या जयघोषात डोली धामवर पोहोचली. शुक्रवारी सकाळी बाबांचे दरवाजे उघडल्यानंतर ही डोली मंदिरात आणण्यात आली. रात्रभर ही डोली विसाव्यासाठी मंदिराच्या भांडारात ठेवण्यात आली होती.