केरळमध्ये मुसळधार पावसामुळे महापूरसदृश स्थिती असून यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पावसाच्या हाहाकारामुळे आतापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बचावकार्य सुरू असून भारतीय नौदलाने खराब हवामानाशी दोन हात करत त्रिचूर, अलुवा आणि मुवात्तूपुझा येथे अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे.
पुराने वेढलेल्या घराच्या छप्परांवर रहिवासी अडकले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच नौदलाचा एक जवान चिमुरड्याला वाचवताना एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे, ज्यावर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. नौदलाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अलुवा इथल्या एका घराच्या छप्परवर अडकलेल्या लहान मुलाला फ्लाइट डायव्हर वाचवताना दिसत आहे. चॉपरवरून हार्नेसच्या आधारे खाली येऊन घराच्या छतावरून त्या चिमुकल्याला उचलून सुरक्षितरित्या वाचवण्यात आलं.
Aluva Rescue effort pic.twitter.com/b3ZbwZ6vcr
— SpokespersonNavy (@indiannavy) August 16, 2018
#OpMadad #KeralaFloodRelief #keralafloods Flight Diver Amit rescues a small child from Aluva. Pilot in Command Cdr Vijay Verma @SpokespersonMoD @DefenceMinIndia @DG_PIB pic.twitter.com/UQmf5rYu27
— SpokespersonNavy (@indiannavy) August 16, 2018
I join the Nation to salute our Flight Diver Amit and his team members. Nation is proud of you. Jai Hind.
— Dr Vinod Kumar Gupta (@Drvinodguptavet) August 16, 2018
Proud of you, Vijay and Amit! May God be with you always!
— Usha Nair (@UshaSahana) August 16, 2018
Kudos to our armed forces. Only God knows what would happen had they not been around.
— JayantaG Sujanya (@JayantaGupta15) August 16, 2018
Incredible video of an @indiannavy diver rescuing a child during the Kerala floods. Humbled by this act of bravery and courage https://t.co/9KmX5WAJtZ
— Amrita Dhindsa (@AmritaDhindsa) August 16, 2018
It defines the heroism that is dedicated to nation. https://t.co/kjTvDIolXU
— Vashisth Anand (@vashisth2009) August 16, 2018
Superman https://t.co/45fWdzCQRA
— Arjun ? (@thearjunshow) August 16, 2018
नौदलाचे हे बचावकार्य पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. केरळमध्ये दिवसरात्र हे बचावकार्य सुरू असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितवर मात करत हे जवान लोकांचे प्राण वाचवत आहेत. लष्कर, नौदल व हवाईदलाच्या ५२ तुकड्या मदत कार्यात जुंपल्या असून अनेक अशासकीय संस्थाही मदतीसाठी सरसावल्या आहेत.