उत्तर इस्रायलमधील मोशाव या ठिकाणी झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मुळच्या केरळमधील एका रहिवाशाचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नावे निबीन मॅक्सवेल असून ते केरळमधील कोल्लम महापालिकेतील कैकुलंगारा येथील रहिवासी होते. निबीन दोन महिन्यांपूर्वी इस्रायलमध्ये गेले होते. तेथे ते एका शेतात काम करायचे.

संध्याकाळी ४ वाजता घडली घटना

जोसेफ आणि पॉल मेलवीन अशी जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत. निबीन यांच्या मृत्यूबाबत कोल्लम येथील नागरिकांनी अधिक माहिती दिलीय. “भारतीय वेळेनुसार सोमवारच्या संध्याकाळी ४ वाजता ही घटना घडली. याआधी निबीन यांनी इस्रायलमधील बिघडत चाललेल्या परिस्थितीची त्यांच्या कुटुंबीयांना कल्पना दिली होती. आम्ही लवकरच अन्य ठिकाणी जाणार आहोत, असेही निबीन यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले होते. या चर्चेनंतर संध्याकाळी उत्तर इस्रायलमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाला,” अशी माहिती कोल्लम येथे राहणाऱ्या निबीन यांच्या नातेवाईकांनी दिली.

Loksatta explained Arab nations split after failed Iranian attack on Israel
जॉर्डनने इराणी ड्रोन, क्षेपणास्त्रे का पाडली? इस्रायलवरील फसलेल्या इराणी हल्ल्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये फूट? 
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

सुरुवातील सांगण्यात आले निबीन जखमी, मात्र…

मिळालेल्या माहितीनुसार निबीन यांचे मोठे बंधऊ निवीन हेदेखील इस्रायलमध्येच आहेत. सुरुवातील निबीन हे क्षेपणास्त्र हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र निबीन यांचा नंतर मृत्यू झाल्याचे निवीन यांनी सांगितले.

लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ला?

दरम्यान, पीटीआयच्या रिपोर्टनुसार हा क्षेपणास्त्र हल्ला लेबनॉन येथून करण्यात आला होता. हा हल्ला लेबनॉनमधील शिया हिजबुल्ला गटाने केल्याचा अंदाज लावला जातोय. मृत निबीन यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुल असा परिवार आहे.