Kerala Crime News : केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका लिव्ह-इन जोडप्याने त्यांच्या दोन नवजात मुलांची हत्या करून त्यांना दफन केलं होतं. मात्र, त्या मुलांचा पिता काही वर्षांनी मुलांचे अवशेष (अस्थी/हाडे) घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल झाला. या घटनेने पोलीसही हादरून गेले. पोलिसांच्या टेबलावर ठेवलेली हाडं पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला. तरुणाने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी त्याला व त्याची जोडीदार अनीशा हिला अटक केली आहे.

भाविश पुथुक्कड (२५) हा रविवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याच्या हातात दोन नवजात अर्भकांचे अवशेष होते. त्याने हे अवशेष पोलिसांकडे दिले व त्यांच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. भाविशने पोलिसांना सांगितलं की त्याने व त्याची जोडीदार अनीशा (२२) हिने मिळून या दोन्ही मुलांच्या जन्मानंतर लगेच त्यांना दफन केलं होतं. पोलिसांनी भाविश व अनीशाला अटक केली आहे.

२०२१ मध्ये पहिल्या अर्भकाला दफन केलं

भाविश हा प्लंबर असून अनीशा लॅब टेक्निशियन आहे. या जोडप्याने पोलिसांना सांगितलं की “आमची फेसबूकवरून ओळख झाली होती. २०२० मध्ये आम्ही भेटलो. त्यानंतर आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. अनीशाने २०२१ मध्ये आमच्या घरातील बाथरूममध्ये एका बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मावेळी नाळ त्याच्या गळ्याभोवती अडकली होती. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही घराजवळच बाळाला दफन केलं.”

आठ महिन्यांनी अस्थी बाहेर काढल्या

आठ महिन्यांनी भाविशने दफन केलेल्या बाळाचे अवशेष जमिनीतून बाहेर काढले. काही हाडं त्यांना सापडली होती जी या जोडप्याने त्यांच्या नात्याची आठवण म्हणून घरात ठेवली आणि मित्रपरिवालाही तेचं सांगितलं. तसेच ते दोघे त्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थी लहान बाळांच्या असल्याचं फॉरेन्सिक तपासांत सिद्ध

दरम्यान, या जोडप्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भांडणं चालू होती. अनीशाचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून वाद चालू होते. याच भांडणादरम्यान रविवारी भाविश संतापला आणि त्याने दुसऱ्या बाळाच्या हाडं देखील जमिनीतून बाहेर काढल्या. दोन्ही बाळांची हाडं घेऊन थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांत जाऊन गुन्हा कबूल केला. भाविशने पोलिसांकडे सोपवलेली हाडं लहान बाळांची असल्याचं फॉरेन्सिक तपासांत सिद्ध झालं आहे. पोलिसांनी भाविशसह अनीशाला देखील अटक केली आहे.