Kerala nurse Nimisha Priya facing execution in Yemen : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेन येथे फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. २०१७ मध्ये तलाल अब्दो मेहदी या येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. ३६ वर्षीय प्रिया २०२० पासून मृत्यूदंडाच्या छायेखाली असून तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले, मात्र या प्रयत्नांना यश मिळू शकलेले नाही. मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी इ़़ंडिया टुडेला या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे.

जेरोम हे गेल्या काही वर्षांपासून ‘सेव्ह निमिषा प्रिया अॅक्शन काउन्सिल’ बरोबर काम करत आहेत आणि येमेनी अधिकारी आणि पीडित व्यक्तीचे कुटुंबिय यांच्यातील वाटाघाटींमध्ये देखील त्यांचा समावेश राहिला आहे.

“आपल्याकडे उपलब्ध असलेला एकमेव पर्याय म्हणजे प्रभावशाली लोकांच्या मदतीने कुटुंबियांचे (पीडित व्यक्तीच्या) ऑफर स्वीकारण्यासाठी मन वळवणे, ” असे जेरोम इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना म्हणाले.

वाटाघाटी करणाऱ्या टीमने मेहदी याच्या कुटुंबियांना १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आर्थिक मदत देऊ केली आहे. तसेच त्यांनी पीडिताच्या कुटुंबातील सदस्यावर किंवा त्यांनी शिफारस केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीवर केरळमध्ये मोफत उपचार करण्याची ऑफर दिली, ज्यामध्ये त्यांचा ये-जा करण्याचा विमान खर्चाचा देखील समावेश होता. इतकेच नाही तर, मेहदी याच्या भावाला युनायटेड अरब अमिरात किंवा सौदी अरेबिया येथे स्थायिक व्हायचे असेल तर त्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी देखील वाटाघाटी करणाऱ्या टीमने दर्शवली आहे. मी पुढील वाटचालीबद्दल आशावादी आहे, असे जेरोम म्हणाले. तसेच त्यांनी मेहदी याच्या कुटुंबियांनी अद्याप या ऑफरवर कोणतेही उत्तर दिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जे काही शक्य होते ते सर्व करण्यात आले असे म्हणत जेरोम यांनी भारत सरकारचे कौतुक केले. त्यांनी विशेषतः माजी परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्हीके सिंग यांनी पाठवलेल्या पत्राचा उल्लेख केला, ज्यामळे निमिषा प्रियाच्या या प्रकरणात खटला तरी चालवला गेला. “(अन्यथा) तिला खूप-खूप आधीच फाशी देण्यात आली असती,” असे जेरोम म्हणाले.

एक शेवटची आशा म्हणून जेरोम यांनी भारत सरकारला विनंती केली की, जर शक्य असेल तर त्यांनी शेखांबरोबर आणि इतर प्रभावशाली लोकांबरोबर चर्चा करवी, जेरोम यांच्या मते हे लोक पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना निमिषा प्रियाला माफ करण्यासाठी आणि पैसे स्वीकारण्यासाठी तयार करू शकतात.

प्रियाच्या आई, प्रेमा कुमारी ज्या २०२४ पासून येमेनमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना जेरोम म्हणाले की त्या सध्या खूपच भावनिक झाल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

निमिषा प्रिया ही २०८ साली कामानिमीत्त येमेन येथे गेली होती आणि तिचे कुटुंब केरळमध्येच होते. तिने २०१५ साली मेहदी याच्याबरोबर स्वतःचे रुग्णालय सुरू करण्यापूर्वी तिने इतर अनेक रुग्णालयांमध्ये काम केले. मेहदी हा तिचा स्थानिक पार्टनर होता. येमेनमध्ये पार्टनर म्हणून स्थानिका व्यक्तीला उद्योगात बरोबर घेण्यासंबंधी कायदा आहे.

प्रियाने मेहदीवर पैशांचा अपहार केल्याचा आरोप केल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला आणि तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. पासपोर्ट परत घेण्यासाठी प्रियाने कथितपणे त्याला सेडेटिव्हजचे इंजेक्शन दिले, पण त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर येमेनमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना प्रियाला अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक न्यायालाने प्रियाला २०२० साली मृ्त्यूदंडाची शिक्षा दिली. तिच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला आव्हान दिले, पण २०२३ ही याचिका फेटाळण्यात आली. या वर्षी जानेवारी महिन्यात माहदी अल-माश्त, प्रिसिडेंट ऑफ द रिबेल हौथी सुप्रीम पॉलिटिकल काउन्सिलने तिच्या शिक्षेला मंजूरी दिली.