Kerala nurse on Yemen death row plea in Supreme Court : केरळमधील एका नर्स निमिषा प्रियाला येमेन येथे एका व्यक्तीच्या हत्येच्या प्रकरणात १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यादरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयात या नर्सला वाचवण्यासाठी तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अ‍ॅक्शन कौन्सिल या संघटनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती, ज्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला राजनैतिक मार्ग खुला करण्याची आणि ‘ब्लड मनी’ देण्यासाठी वाटाघाटी कराव्यात अशी विनंती केली आहे. शरिया कायद्यानुसार पीडिताच्या कुटुंबियांनी आरोपीला माफ करावे यासाठी कायदेशिर पद्धतीने भरपाई देता येते, या भरपाईला ‘ब्लड मनी’ असे म्हणतात.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील रागेंथ बसंत यांनी न्यायमूर्ती सूधांशू धुलिया आमि जोयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे गुरूवारी हे प्रकरण मांडले. फाशीच्या शिक्षेच्या अमंलबजावणीची तारीख जवळ येत असल्याच्या मुद्द्यावर भर देत त्यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता नमूद केली. त्यांनी यावेळी न्यायालयात युक्तीवाद केला की, येमेन येथील पहिल्या अपीलीय न्यायालयाने निमिषाची याचिका फेटाळून लावली असली तरी, ब्लड मनीचा पर्याय खुला ठेवला आहे आणि पीडिताच्या कुटुंबियांबरोबर वाटाघाटी झाल्यास तिला फाशीच्या शिक्षेपासून वाचवता येईल.

निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्याची हीच वेळ आहे असेही वकीलांनी न्यायालयात सांगितले. यादरम्यान न्यायालयाने हे प्रकरण सोमवारी ऐकले जावे असे सुचवले, मात्र राजनैतिक प्रक्रियेसाठी वेळ आवश्यक असतो असा युक्तीवाद करत वकीलांनी लवकरच्या सुनावणीची मागणी केली. यानंतर खंडपीठाने १४ जुलै रोजी या प्रकरणावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला येमेनी नागरिक तलाल अब्दो मेहदी याची २०१७ मध्ये हत्या केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निमिषा प्रियाने त्या व्यक्तीकडे असलेला तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी त्याला सेडेडिव्हज दिले होते, ज्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.