Fancy Number Plate : केरळमधील लिटमस ७ सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि संस्थापक वेणू गोपालकृष्णन यांनी राज्यातील सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक खरेदी केला आहे. यानंतर गोपालकृष्णन हे चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहेत. मोटार वाहन विभागाने (MVD) आयोजित केलेल्या ऑनलाइन लिलावात त्यांनी ४५.९९ लाख रुपये देऊन त्यांच्या अंदाजे ४ कोटी रुपये किमतीच्या लक्झरी लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंट (Lamborghini Urus Performante) कारसाठी ‘KL 07 DG 0007’ हा नंबर विकत घेतला आहे.

हा लिलाव ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये हा क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ लागल्याचे पाहायला मिळाले. या क्रमांकासाठी ५ जणांनी २५ हजार रुपयांपासून बोलीला सुरूवात केली. अखेर या लिलावात शेवटी दोन जण शिल्लक राहिले, मात्र हा क्रमांक मिळवण्यासाठी गोपालकृष्णन यांनी अखेरची बोली लावली आणि त्यांनी हा क्रमांक मिळवला. त्यांनी थोड्याशा फरकाने ४४.८४ लाख रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बोलीला मागे टाकले.

दुसरा एक फॅन्सी क्रमांक ‘KL 07 DG 0001’ यासाठी देखील या लिलावात बोली लावण्यात आली आणि हा क्रमाक २५.५२ लाख रुपयांना विकला गेला. केरळच्या सरकारने फॅन्सी वाहन क्रमांकाचे सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले होते. ज्यामध्ये सुरूवातीची किंमत ३००० रुपयांपासून ते १ लाख रूपयांपर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. ‘१’ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असल्याने याची मूळ किंमत ही सर्वाधिक म्हणजेच १ लाख रुपये होती.

दरम्यान गोपालकृष्णन यांनी का वाहन क्रमांक विकत घेतल्यानंतर त्यांची लक्झरी कार लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. गोपालकृष्णन यांचा दावा आहे की त्यांच्याकडे असलेली ही कार केरळमधील अशा प्रकारची पहिलीच कार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रतीक्षा संपली! आमच्या कुटुंबात नव्याने सहभागी झालेल्या केरळमधील पहिल्या लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंट पाहा. ही केरळमधील विक्रमी किंमती असलेल्या सर्वात महागडा फॅन्सी वाहन क्रमांक ‘केएल ०७ डीजी ०००७’मुळे सध्या चर्चेत आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.